एकटाच हरवलो मी अन्
बसलो
एकाच आशाकिरणाची वाट
पहावया...
स्वप्न उराशी
पूर्वीचे तेच
आसक्ती तीव्रता आणि
लढाऊ हे शरही तेच
मात्र मन हे वेडे
उगा धावते
ते थोडे क्षणभंगूर
दुःख अनुभवावया
झाले हे जेव्हा
नियंत्रणापार तत्क्षणी मजसाठी
दाही दिशा
काळोखल्या...
मज पुरेपूर जाणीव
माझ्या मार्गाची
थोड्या खाचखळग्यांसाठी
राजमार्ग सोडणे मनास न पटती
परी मजचे माझे या
गोष्टीस उपेक्षिती
समंजसपणा अभावी
सोनेरी साथ सोडिती
होऊनी अतिरेक असह्य
याचा
मम आव्हानात भर
पडाया
दाही दिशा
काळोखल्या...
ही रात्र संपवणारा
भास्कर दूरदूर दिसत नाही
क्षितीज दिसते,
मात्र मन जाणितसे तयास अंतच नाही
असत्य दिलासा ऐकायचे
सामर्थ्यही आता नाही
मात्र ;
तरी या वेड्या आशेस
उपाय आहे का कोठे काही?
हेच शेवटचे ब्रीद
म्हणुनी ठसवले अन् उद्गारलो,
दाही दिशा काळोखल्या
जरी एकटाच हरवलो मी
तरी निर्धाराने बसलो
‘त्या’ आशाकिरणाची
वाट पहावया...
- Pankaj Pandit Ghuge
- Pankaj Pandit Ghuge
